Wednesday, April 17, 2024

मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा एकदा नगरच्या मैदानात…विखेंसाठी राष्ट्रवादीची बैठक…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरुवारी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.

मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्याध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles