Sunday, March 16, 2025

आ.संग्राम जगताप यांची ‘गॅरंटी’….नगरमध्ये विखेंना मोठे मताधिक्य मिळवून देणार

आमदार संग्राम जगताप यांचा शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार
महायुतीच्या उमेदवाराला शहरातून मताधिक्य मिळणार -प्रा. माणिक विधाते
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी शहराचे आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, प्रा. अरविंद शिंदे, बाळासाहेब जगताप, ओबीसी सेलचे अमित खामकर, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, साधना बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, मळू गाडळकर, निलेश बांगरे, जॉय लोखंडे, संतोष ढाकणे, जितू गंभीर, विकी वाघ, माऊली जाधव, राहुल जाधव, सोनू घेंबूड, विशाल पवार, संभाजी पवार, सुमित कुलकर्णी, सागर शिंदे, सत्यजीत ढवण आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांचा असलेला सर्व स्तरातील नागरिकांशी जनसंपर्क पाहता त्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अहमदनगर लोकसभा (दक्षिण) मतदार संघाच्या समन्वयकपदी निवड केली आहे. त्यांची झालेली नियुक्ती ही प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारीला अभिमानास्पद असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून, एकसंघपणे महायुतीचे काम करणार आहे. जगताप यांच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला शहरातून मताधिक्य मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles