अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ प्रवक्ता ‘ पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ॲड.संदीप वर्पे यांना नियुक्ती पत्र दिले.
या प्रसंगी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी माजी मंत्री प्रजक्तदादा तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके आदी उपस्थित होते
या पूर्वी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
शरद पवार साहेबांचे निष्ठावान म्हणून त्यांना ओळखले जाते, उच्चशिक्षित व अभ्यासू असल्याने शरद पवार साहेबांनी नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या ‘ जनरल बॉडी सदस्य ‘ पदी नियुक्ती केली होती.
अभियांत्रिकी व कायद्याचे पदवीधर असलेले ॲड.संदीप वर्पे यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदा बरोबरच ‘ प्रदेश प्रवक्ता’ या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ प्रवक्ता ‘ पदी यांची नियुक्ती
- Advertisement -