Wednesday, April 17, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी व कार्याध्यक्षपदी यांची निवड

अहमदनगर –
राज्य बाजार समिती संघाचे चेअरमन श्री. बाळासाहेब नाहाटा(श्रीगोंदा) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड
तर संजय कोळगे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संग्राम जगताप माजी आमदार चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, कपिल पवार राजेंद्र गुंड आदी उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर अजित पवार गटाकडून पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पारनेरचे माजी सभापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीवर करण्यात आली आहे.गायकवाड यांच्या जागी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles