राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी जैतून काकडे यांची निवड व ख्रिस्ती युवकांचा जाहीर प्रवेश संपन्न
युवकांनी पुढे येऊन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा – आ. संग्राम जगताप
नगर : राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजच्या युवकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, काम करणाऱ्याला विविध अडचणी येत असतात काकडे कुटुंबियांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजूवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम केले आहे, हाच सामाजिक वारसा जैतून काकडे यांनी पुढे चालू ठेवला आहे, सामाजिक काम करत असताना त्याला राजकीय जोड लागत असते त्यासाठी त्यांनी निर्णय घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, त्याचबरोबर ख्रिस्ती समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, शासनाकडून तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 18 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे, आता ते काम सुरू आहे, युवकांनी पुढे येऊन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यातून शहर विकासाला गती येईल, आता आपले शहर चारी बाजूने वाढत असून वेगवेगळे उपनगरे निर्माण होत आहे, पुणे नाशिक येथील बांधकाम व्यवसाय नगरमध्ये आली असून चांगले गृहप्रकल्प उभे करीत आहे, त्यामुळे नगरकरांना चांगली घरे निर्माण होत आहे, सुरक्षित वातावरण असल्यामुळेच बाहेरचे व्यावसायिक नगरमध्ये येत असून हे सुरक्षितेचे प्रतीक आहे, हेच सुरक्षिततेचे वातावरण कायमस्वरूपी ठेवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, निवडणुका आल्या की अनेक जण काल्पनिक चित्रपट घेऊन येत असतात आणि निवडणुका संपल्या की हे लोक गायब होत असतात, शहराचा विकासाचा बंद पडलेला गाडा हा सर्वांच्या साथीने चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जात आहे, या माध्यमातून मेट्रोसिटीकडे वाटचाल करीत आहे, नगरमध्ये विविध कंपन्यांचे ब्रँडचे शोरूम निर्माण झाले असून आता नगरकरांना पुणे मुंबई येथे जाण्याची गरज नाही, नगरमध्येच सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी जैतून काकडे यांची निवड व ख्रिस्ती युवकांचा जाहीर प्रवेश आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सरोजकुमार साळवे यांनी केले यावेळी प्रा. माणिकराव विधाते, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, वैभव ढाकणे, जितू गंभीर, गजेंद्र भांडवलकर, सागर गुंजाळ, साहेबान जहागीरदार, भूपेंद्र परदेशी, अभिजीत काकडे, प्रणील काकडे, अभिषेक साळवे, अनिकेत साळवे, अनिकेत गायकवाड, विराज सोनवणे, वेदांत क्षत्रिय, निलेश बनसोडे, रितेश बनसोडे, प्रितेश बनसोडे, प्रशांत बनसोडे, प्रतीक गायकवाड, प्रतीक पंडित, आशिष त्रिभुवन, कुणाल गायकवाड, गणेश क्षत्रिय, मनीष क्षत्रिय आदी उपस्थित होते,
जैतून काकडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची संधी मिळाली आहे, सर्वांना बरोबर घेऊन शासनाच्या योजना युवकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल, आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून ती कामे सुरू झाली आहे, त्यामुळे आम्ही सर्व युवक प्रेरित झालो असून सकारात्मक दृष्टिकोनातून चांगले काम उभे केले जाईल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे आभार पाटोळे सर यांनी मानले