Monday, December 4, 2023

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, महावितरणला दिला हा इशारा…

शहरातील विद्युत पुरवठा खंडित केल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फसणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांचा इशारा

नगर : नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा उत्साह असताना सणासुदीच्या काळामध्ये नगर शहरासह कापड बाजारामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी व नागरिक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नगर शहरात येत आहे, कापड बाजारामध्ये आधीच मंदीचे दिवस असून आता दिवाळी निमित्त ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येत असून त्यात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे, सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित केल्यास अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिलाय. कापड बाजारातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहण्यासाठी अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी व्यापारी किरण व्होरा, शाम देडगावकर, प्रकाश बायड, दीपक नवलानी, राहुल मुथा, प्रतिक बोगावात, अभय गांधी, शामभाऊ काथेड, सोनू भटेजा, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, सोमा तांबे, शुभम टाक, बाबू औताडे, सचिन निक्रड, एम जी रोड असोसिएशन, वंदे मातरम ग्रुप, व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते,

चौकट : आ. संग्राम जगताप यांनी अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सांगितले की, सणासुदीच्या काळात विद्युत पुरवठा खंडित करू नये, आता दिवाळी सण सुरु असून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहे, तरी विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेश दिले त्यावर अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी कापड बाजारात तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल असे सांगितले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: