Saturday, May 18, 2024

लंकेंना उमेदवारी देऊ नका, महसूलमंत्र्यांचा निरोप घेऊन उद्योजक भेटला…शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी नगरमध्ये एक सभा घेतली आहे. या सभेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत विखे कुटुंबावर टीकाही केली. निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, असा निरोप उद्योजक घेऊन आला होता. हा निरोप महसूलमंत्र्यांनी उद्योजकामार्फत पाठविला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

शहरात गांधी मैदान येथे ही सभा झाली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles