Thursday, July 25, 2024

अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ नाराज नाहीत. ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा होऊन त्यांचे निराकरण झाले. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाबद्दल केलेला अपप्रचार, अल्पसंख्यांक समाजाबद्दल असुरक्षितता निर्माण करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे देशात आणि राज्यात एनडीए पिछाडीवर जाण्याच कारण ठरले आहेत, असंही ते म्हणाले. काही मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. तरीही युतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. त्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल पाहून विश्लेषण करू, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आघाडी मिळाली आहे. मात्र अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles