Tuesday, February 27, 2024

संपत बारस्करांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आक्रमक…महावितरण अधिकाऱ्यांच्या दालनातीलच बत्ती केली गुल…

नगर : अहमदनगर महापालिकेच्या वतीने मुळा धरणावरून शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा थकीत वीजबिलासाठी एमएससिबीने खंडित करून २४ तास उलटून गेले आहे, यावर अद्याप काही तोडगा निघाला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सुमारे ७ लाख लोकांना मनपा व एमएससिबी कार्यालयाच्या वतीने वेठीस धरण्याचे काम केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी एमएससिबी कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता यांच्या दालनात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने मुळा धरण येथील वीज पुरवठा सुरु करत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असून यापुढे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करू नये, प्रशासकीय पातळीवर तुम्ही पाठपुरावा करा तसेच यापुढे अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालून देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला

शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले,यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाऊलबुद्धे, अजिंक्य बोरकर,प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, डॉ.सागर बोरुडे इंजि. केतन क्षिरसागर आदींसह कार्यकर्ते व मनपाचे अधिकारी उपस्थित होते,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी आयुक्त यांच्या दालनात जाऊन जाब विचारत म्हणाले की, २४ तास उलटले असून पाणी पुरवठा सुरळीत केला नाही यावेळी आयुक्तांनी सांगितले की, महावितरणला मनपावतीने २६ कोटी रुपये भरले असून फक्त १ महिन्याचे वीजबिल थकीत आहे, सध्या मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षणासाठी मनपाचे कर्मचारी काम करत असल्याने वसुलीवर परिणाम होत आहे, त्यानंतर आंदोलनकर्त्यांचा मोर्चा एमएससीबीकडे वळाला,

अधिकाऱ्यांची मनमानी – निखिल वारे

सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार व महसूल मंत्री असताना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कोणताही संपर्क न साधता अधिकाऱ्यांनी मनमानीपणा करत नगर शहराचा पाणी पुरवठा खंडित केला आहे, अधिकाऱ्यांनी आधी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते, यापुढील काळात अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनपाचे माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले यावेळी नगरसेवक आक्रमक झाल्याचे निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत मनपाचा मुळा धरणावरील पाणीपुरवठा सुरळीत केला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles