Friday, June 14, 2024

अहमदनगर मधील धक्कादायक घटना…. बापानेच पोटाच्या मुलाचा केला खून

अहमदनगरमधून आणखी एक खुनाचे प्रकरण उजेडात आले आहे.स्वतः पित्यानेच पोटाच्या मुलाचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली. स्वतः आईनेच याबाबत फिर्याद दिली. ही घटना नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव आहे.

नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथील शेतकरी दादा सारंगधर जाधव व त्यांचा मुलगा शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव, ता. नेवासे) यांच्यात शेती वाटपाच्या कारणावरून सतत वाद होत होता.

या भांडण- तंट्याच्या वादातून दादा जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) सायंकाळी सुमारास घडली. पाच वाजण्याच्या १८ मे रोजी मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली.शिवाजीची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन दादा जाधव याच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाणे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles