Saturday, December 7, 2024

नगरमध्ये आणखी दोन उड्डाणपूल… मुंबईत महत्वपूर्ण बैठक !

आज मंत्रालय, मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्रजी चव्हाण आणि महसूल मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अहमदनगर शहरात डीएसपी चौक तसेच अहमदनगर-मनमाड रस्त्यावर स्थित एमआयडीसी च्या नवनागापूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता दोन नवीन फ्लायओव्हरची आवश्यकता आणि अनेक वर्षांपासून शेवगाव मध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शेवगाव येथे नवीन बायपासच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा झाली.

दरम्यान यावेळी मा. मंत्री महोदयांनी या तिन्ही कामांसाठी नव्याने प्रस्ताव तयार करून आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या तिन्ही कामांनी अहमदनगर आणि शेवगावच्या नागरिकांना ट्रॅफिक मधून होणाऱ्या त्रासातून लवकरच मुक्तता मिळेल अशी अपेक्षा आहे. या महत्वाच्या कामांबाबत पाऊले उचलण्यासंबंधी सकारात्मकता दाखविल्याबद्दल मा. चव्हाण साहेब आणि मा. विखे पाटील साहेबांचे या बैठकीदरम्यान आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles