Tuesday, September 17, 2024

धक्कादायक! तीक्ष्ण हत्याराने वार करून अज्ञात व्यक्तीचा खून ,अहमदनगरमधील घटना

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.आज शुक्रवार रोजी सकाळी दाहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांनी पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर याची सर्व गावात चर्चा होऊन घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,उपनिरीक्षक विजय बोभे, मनोज आहेर,विकास पाटील व पोलीस नाईक ढमाळे यांनी येऊन अज्ञात व्यक्तीच्या प्रेताची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला.तसेच पुढील पंचनामा करण्यासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पाठविण्यात आला आहे .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles