लग्न करुन आलेली नवविवाहित तरुणी लग्नाच्या दुसर्याच दिवशी घरातील सोन्याचे दागीने घेऊन फरार झाली. तर लग्न लावून देणारे दलालांनी दोन लाख रूपये घेऊन नवरदेवाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उघडकीस आली.
कानिफनाथ श्रीरंग थोरात (वय ५० वर्षे, रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) हे त्यांच्या मुलासह राहत आहेत. त्यांची पत्नी २०१८ मध्ये आजारपणात मयत झाली. घरात दुसरी कोणती महिला नसल्याने . घरात स्वयंपाक करुन घर सांभाळण्यासाठी कानिफनाथ थोरात यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरवीले. या दरम्यान वांबोरी येथील तिघा जणांनी कानिफनाथ थोरात यांना विविहासाठी मुलगी दाखवली. त्या बदल्यात त्यांनी दोन लाख रूपये रोख घेतले. त्यानंतर दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजे दरम्यान कानिफनाथ थोरात व सदर मुलीचा विवाह राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील खोलेश्वर मंदिर येथे लावून देण्यात आला. कानिफनाथ थोरात याने आपल्या नववधूला विवाह प्रसंगी १७ हजार ५७० रुपयांचे दागीने घातले. त्यानंतर कानिफनाथ थोरात यांनी आपल्या नववधूला धामोरी खुर्द येथील आपल्या घरी नेले. लग्नाच्या दुसर्या दिवशी दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ७ वाजता सदर नवविवाहित तरुणीने पती कानिफनाथ थोरात यांना चहा करुन दिला. चहा पिल्यानंतर कानिफनाथ थोरात यांना गुंगी आल्याने ते झोपी गेले. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आला. त्याने कानिफनाथ यांना झोपेतून उठवीले. त्यावेळी त्यांची नवविवाहित पत्नी घरातुन गायब झाल्याचे दिसले. तीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. ती अंगावरील दागीने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले. सदर भामट्यांनी मिळुन आपले दोन लाख रूपये व १७ हजार ५७० रुपयांचे सोन्याचे दागीने असा एकूण २ लाख १७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक केल्याचे कानिफनाथ थोरात यांच्या लक्षात आले.
घटनेनंतर कानिफनाथ श्रीरंग थोरात यांनी राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तसेच तरुणीसह चार जणा विरोधात तक्रार अर्ज दिला.
आदल्या दिवशी लग्न, दुसऱ्याच दिवशी विवाहिता गायब, नवरदेवाची फसवणूक, नगरमधील घटना
- Advertisement -