आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी येथील तनवीर आतार याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवगाव विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.१ चे पथक प्रमुख निलेश विठ्ठल झिरपे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (३०) में रोजी सायंकाळी भरारी पथकाचे प्रमुख झिरपे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेश कदम यांनी कळविले की, पाथर्डी शहरात आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करणारे फलक (बॅनर) लावले आहे.त्यावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन मा. श्री निलेश लंके साहेब यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मा.तनविर भैय्या अतार मित्र परिवार अशा मजकुराचे फलक आहे. झिरपे हे त्यांच्या पथकासह जावुन त्यांनी पाथर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाथर्डी ते अहमदनगर जाणारे रोडवर जुने बस स्टॅण्डचे समोर असणारे बॅनर (फ्लेक्स बोर्ड)काढून घेते पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तनवीर आतार याचे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.