Sunday, July 14, 2024

सेवापूर्तीनिमित्त जनता विद्यालयात क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..

क्रीडा अधिकारी : श्री अजय पवार व श्री सुधीर चपळगावकर यांचा सत्कार ..

तालुका प्रतिनिधी :- रुईछत्तीसी येथे जनता माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी श्री.अजय पवार व श्री सुधीर चपळगावकर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यरत असताना ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम श्री अजय पवार व श्री सुधीर चपळगावकर यांनी नेहमीच केले. ग्रामीण खेळाडूंना राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरापर्यंत मार्गदर्शन केले. आदर्श खेळाडू घडवण्याचा कार्य करणाऱ्या या क्रीडा अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने नगर जिल्ह्यातील ग्रामीण क्रीडा क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे दिसते.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात काम करत असताना जनता विद्यालय रुईछत्तीशी ता. नगर या विद्यालयातील शेकडो खेळाडूंना राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावर अजिंक्यपद पटकवण्याबाबतचे मार्गदर्शन या अधिकाऱ्यांनी केले त्यानिमित्ताने खेळाडूंशी निर्माण झालेला त्यांचा ऋणानुबंध आजही पहावयास मिळतो. विद्यालयातील माजी राष्ट्रीय खेळाडू आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक श्री दत्ता नारळे सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय खेळाडू व रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच श्री रमेश भांबरे हे होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवाजीराव धामणे यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी श्री प्रविण गोरे ,सोमनाथ गोरे, भाऊसाहेब पवार व माजी खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महानोर सर यांनी केले व आभार डॉ.नवनाथ वाव्हळ सर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles