सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी वंचित घटकांना समाज प्रवाहात आणण्यासाठी पिंपळे नेहमी प्रयत्न करत असतात.आज उपेक्षित वंचित समाजातील निराधार बालकांचे हक्काच घर “बालघर प्रकल्प” तपोवन रोड मधील वंचित निराधार मुलांना संगणकीय शिक्षण मिळण्यासाठी पिंपळे यांनी संगणक संच उपलब्ध करून दिला.व माझ्या हस्ते प्रदान सोहळा होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.ह्याच विद्यार्थी वर्गातून पुढे अधिकारी, उद्योजक तयार व्हावेत.प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांची सेवाभावी वृत्ती ह्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करील,असा विश्वास असमंज एनर्जी सोल्युशन्स चे संचालक सागर भोपे यांनी व्यक्त केला.ते बालघर प्रकल्प ,तपोवन रोड अहमदनगर येथे बोलत होते.भाजप किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश पिंपळे यांनी प्रकल्पास संगणक संच भेट दिला. यावेळी रमेश पिंपळे,प्रकल्प संचालक युवराज गुंड अभिनव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरला राळेभात,शिक्षक संजय लोखंडे,आशिष अहिरे उपस्थित होते.यापुढे ही प्रकल्पास साहाय्य करण्याचे आश्वासन रमेश पिंपळे यांनी दिले.
- Advertisement -