Saturday, April 26, 2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत दिव्यांग पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा

अहमदनगर- जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विविध विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा *गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सभागृह, अहमदनगर येथे होणार आहे.
हे पुरस्कार श्री ज्ञानेश्वर डगळे, रमेश सुपेकर, गणपत सुकटे, संजय बोरसे,नामदेव पटारे, श्रीमती राजाबाई कांबळे, अब्दुल अहद अमीन, संजय हरकळ, शशिकांत शेंडकर, श्रीकांत देव्हडे, ज्ञानदेव तरटे ,महेश नेहूल, श्रीमती जयश्री घोलप, श्रीमती सुनिता पालवे, अमरनाथ उपाध्ये, राजेंद्र कलगुंडे, अक्षय वैद्य, श्री सुरेश घावटे, सागर जगताप, आदींस संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दत्तात्रय जपे यांनाही हा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संभाजीराव लांगोरे साहेब, शिक्षणाधिकारी श्री भास्करराव पाटील साहेब, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री राजू लाकूडझोडे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल शेळके, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी दिली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी अपंग कर्मचारी संघटनेमार्फत दिव्यांग कर्मचारी मार्गदर्शन कार्यशाळा व पुरस्कार वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये शारीरिक अडचणीवर मात करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राज्यसह कोषाध्यक्ष श्री संतोष सरवदे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड व सचिव पोपट धामणे यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र औटी ,उद्धव थोरात, बन्सी गुंड, राजेंद्र ठूबे, साहेबराव मले, रमेश शिंदे, विजय राऊत, अमोल चन्ने,किरण माने ,गजानन मुंडलिक, अनिल घोलप, शिवाजी आव्हाड, बळीराम जाधव संतोष वांडरे, सुनील मेचकर, भाऊराव नागरे, खंडू बाचकर, अनिल ओहोळ, चरण सिंग काकरवाल, दादासाहेब गव्हाणे, विष्णू बोडखे, रामकिसन डमाळे,विजय अंधारे, सचिन रनाते, आबासाहेब बिडकर, खंडू बाचकर,विश्वस्त दत्तू फुंदे,अजय लगड आदी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles