सुर्योदय फांऊडेशन संचलित व्यसनमुक्ती केंद्राचे काम दिशादर्शक : राकेश ओला
नगर : व्यसनामुळे समाजातील युवा पुढी अकार्यक्षम होत चालली आहे. दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत चालले असून व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींची शाररिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक हानी मोठया प्रमाणावर होत असते. अशा व्यक्तींना योग्य सल्ला व मागदर्शन मिळाल्यास त्या निश्चितच व्यसनमुक्त होऊ शकतात. यासाठी सूर्योदय फाऊंडेशन करीत असलेले काम दिशादर्शक आहे, असे कौतुकोद्गार पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच सूर्योदय फाउंडेशन व्यसनमुक्ती संस्थेस भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेत व्यसनमुक्तीसाठी दाखल असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींची विचारपूस केली व नेहमी व्यसनमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शनपर सल्ला दिला. सूर्योदय फांऊडेशनच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेच्या दैनंदिन कामकाज, कार्यपध्दती व अडीअडचणीबाबत त्यांनी आवर्जून माहिती घेतली. या व्यसनमुक्ती संस्थेची स्थापना सन 2014-15 मध्ये झाली असून संस्थेमार्फत आतापर्यंत 686 व्यक्तींनी व्यसनमुक्तीचे धडे घेतलेले आहेत. यावेळी पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक राहुल सोळंके ,संस्थेच्या अध्यक्षा माधुरी झरेकर, संस्थेचे गेस्ट समुपदेशक व मागदर्शक रविंद्र ठाणगे, संस्थेचे वैदयकिय सल्लगार डॉ. महेंद्र पिपळे, सुपरवायझर अमोल गिऱ्हे ,उद्योजक दत्ता खैरे आदी उपस्थित होते.
सुर्योदय फांऊडेशन संचलित व्यसनमुक्ती केंद्राचे काम दिशादर्शक : राकेश ओला
- Advertisement -