आदिनाथनगर शाळेची हॅकेथॉन स्पर्धेत भरारी
अहमदनगर येथे झालेल्या कोडींग हॅकेथॉन स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर च्या विद्यार्थींनींनी उत्तुंग यश मिळवले.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थीनी ईश्वरी ज्ञानेश्वर ढवळे, भक्ती संदिप चितळे, दुर्गा गोरख दारकुंडे यांनी सहभाग घेतला. विद्यार्थीनींना अरुण कराळे सर आणि श्रीमती अलका भणगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील विजयाबद्दल शाळेला टॅबलेट, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थींनींनीचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ. आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे, संस्थेचे विश्वस्त राहुलदादा राजळे, संस्थेचे सचिव भास्करराव गोरे, मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे यांनी अभिनंदन केले.