प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा-मोहनबुवा रामदासी.
नगर -श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी बलिदान व सर्वस्व अर्पण केले आहे.22 जानेवारी रोजी बहु प्रतिक्षीत अशी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत आहे.ही हिंदू धर्मीयांची व समस्त रामभक्तांची अस्मिता आहे.समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी राम कथेचे ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याचे स्वप्न त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीचा व्यापक विचार मनात ठेवून समाजासमोर ठेवले होते. देव,देश,आणि धर्म हा सर्वांचा प्राण आहे.श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे.या दिवशी सर्वांनी दीपोत्सव साजरा करावा.प्रभु श्री रामाच्या नावाचा गजर करावा.असे श्री समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी सांगितले आहे.
कर्जत,खातगाव येथील श्री क्षेत्र समर्थ रामदास स्वामी मठ येथे समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांना अयोध्येचे प्रभु श्रीराम मंदिर तिर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील खिस्ती यांनी दिली.याप्रसंगी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे,शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर,कर्जत रा.स्व.संघाचे कार्यवाह स्नेहल देसाई आदी उपस्थित होते.
समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांना आयोध्याचे निमंत्रण
- Advertisement -