महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या पर्यवेक्षणाखाली कुलस्वामिनी कला मंच नेवासा व जय हिंद कला मंच शेवगाव यांच्या कलापथकाचा कार्यक्रम द्वारे जिल्ह्यातील विविध भागात सर्वसाधारण जनता ,अति जोखमीचे गट यांच्यामध्ये एच आय व्ही एड्स जनजागृती करिता कला पथकाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यात एच आय व्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी नियमितपणे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
कलापथक हे माध्यम मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचण्याचे एक उपयुक्त माध्यम आहे. त्याचप्रमाणे कलेद्वारे संदेश देणे उपयुक्त आहे आणि त्यास सर्वसाधारण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतो, त्यामुळे जिल्ह्यात एकूण 31ठिकाणी कलापथकाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अहमदनगर शहर, राहुरी, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, नेवासा ,पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा ,पारनेर या तालुक्यातील गर्दी असलेल्या भागात तसेच स्थलांतरित कामगार अति जोखमीचे गट, युवा वर्ग असलेल्या भागात, सदर कलापथकांचा कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. दिनांक 7 फेब्रुवारी पासून 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीत एकूण 31 ठिकाणी पथनाट्य कलापथक कार्यक्रम घेण्यात येत आहेत . या कलापथकाद्वारे मनोरंजनातून महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे , त्यात एच आय व्ही, एड्स म्हणजे काय ? संसर्ग होण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, समज- गैरसमज, मोफत तपासणी ,मोफत उपचार सुविधा केंद्रांची माहिती त्याचप्रमाणे संसर्गित रुग्णांबाबत भेदभाव होऊ नये याकरिता ची माहिती , एच आय व्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 आणि राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1097 इत्यादी बाबत माहिती दिली जात आहे . या कलापथकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एच आय व्ही एड्स बद्दलची माहिती प्रसार करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून यापुढील कालावधीत नवीन संसर्ग होऊ नये ज्यांना संसर्ग आहे ,त्यांना चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, त्यांच्याबाबत भेदभाव होऊ नये व उपलब्ध सोयी सुविधांचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा यासाठी प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यातील सदर भागात पथनाट्याचे नियोजन समन्वय अंमलबजावणी करण्याकरिता श्री शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे कार्य करत असून त्याकरिता जिल्ह्यातील राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमातील आयसीटीसी समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याचप्रमाणे एच आय व्ही प्रकल्प राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी कर्मचारी हे सक्रियपणे कार्य करत आहेत.
कलापथक कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात एच आय व्ही एड्स बाबत जनजागृती
- Advertisement -