Wednesday, April 17, 2024

सेवानिवृत्तीनिमित्त बाळकृष्ण रोल्ला यांचा सत्कार,सेवानिवृत्ती प्रत्येकासाठी भावूक क्षण

सेवानिवृत्ती प्रत्येकासाठी भावूक क्षण
मेजर यादव । सेवानिवृत्तीनिमित्त बाळकृष्ण रोल्ला यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) – अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्त. अनेक वर्षे कार्यालयासाठी केेलेली सेवा सोडताना प्रत्येक कर्मचारी भावूक होत असतो. गॅरिसन इंजिनिअर या लष्कराच्या आस्थापनेत बाळकृष्ण रोल्ला यांनी कारपेंटर म्हणून चांगली सेवा बजावली. निवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी समाजकार्यासाठी व्यतित करावे, असे प्रतिपादन सुभेदार मेजर सुरेंद्रसिंग यादव यांनी केले.
लष्करी आस्थापनेत कार्यरत असलेले बाळकृष्ण रामय्या रोल्ला 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. या वेळी त्यांचा सत्कार यादव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार मेजर प्रसाद, विकाल रंधे, प्रशांत पवार, अक्षय ग्यार, आनंद जाधव, अमित गुप्ता, रिदम गजर, संजय बेरड, विक्रांत शेंद्रे यांच्यासह रोल्ला कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी बोलताना अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांनी रोल्ला यांच्या सेवेची प्रशंसा केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles