इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत गवांदे क्लासचे युवराज वारे व समर्थ सावंत गणित विषयात राज्यात सर्वप्रथम
नगर : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत गवांदे क्लासच्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात अभूतपूर्व यश मिळवले आहे. यामध्ये युवराज वारे आणि समर्थ सावंत या दोन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून गणित विषयात राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच क्लासच्या ४५ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी ९० पेक्षा जास्त गुण मिळवून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे नगर शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील उज्वल परंपरा सुरू ठेवली आहे. निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव देण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न सुरू असते. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आम्ही करत असून सार्थक नांगरे ९९, पियुष गायकवाड ९९, मानसी लाटे ९८, तेजस पाठक ९८, कृष्णा हजारे ९८, प्रणव व्यवहारे ९७, पोर्णिमा पोटे ९७,शुभम ओव्हळ ९७, सत्यम पालवे ९७, आदित्य आमले ९६, अमित विधाते ९६, श्रीकांत नाईक ९६, विशाल गणबोटे ९६, स्वरा चव्हाण ९६, वेदांत नेहुल ९६, आदित्य दाणी ९५, सकक्षांत सालके ९५, तेजस शिंदे ९५, गौरी दहातोंडे ९४, कांचन दहातोंडे ९४, सृष्टी किरवे ९५, आयुष आंधळे ९५, किरण बोटे ९४, स्नेहल काळे ९३, स्नेहल होळकर ९३, श्रेया भुजबळ ९३, भक्ती काळे ९३, जयदीप मुंदडा ९३, अंजली शिंदे ९३, निवडुंगे कावेरी ९३, सुरज गायकवाड ९२, सौंदर्या परदेशी ९१, ओंकार देवकर ९१, ओंकार चव्हाण ९१, सोहम बुरशे ९०, प्रवीण जरे ९०, साक्षी कार्ले ९०, सिद्धांत कर्डिले ९० गुण मिळविले दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही आम्ही सर्वोच्च निकालाची परंपरा कायम राखले आहे. आम्ही विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यावर भर देत असून सरावावरती जास्त लक्ष केंद्रित करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करत असल्याची माहिती गवांदे क्लासेस चे संचालक प्रभाकर गवांदे यांनी दिली.
गवांदे क्लासेसच्या वतीने ११५ विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा जास्त गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इतिहास संशोधक प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ व क्लासचे संचालक प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी छायाताई गवांदे, युवराज महांडुळे, मोनावी पवार, किशोर गीते, विकास पालवे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. नवनाथ वाव्हळ म्हणाले कि, विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये वावरत असताना आपल्यामध्ये सहास,उद्दिष्टे आणि क्षमता पूर्ण केल्यानंतर यशाच्या शिखराकडे वाटचाल करता येत असते, शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले असून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे. गवांदे क्लासच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे. त्यांच्या यशाबद्दल कौतुक करत पाठीवर शब्बासकीची थाप दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होण्याचे काम होत असते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम प्रभाकर गवांदे सर करत आहेत. गवांदे क्लासच्या बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी परंपरा असून यावर्षी देखील ४२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असे ते म्हणाले.
गवांदे क्लासेस मध्ये ११ वी, १२ वी, एम. एच. टी. , सी.ई. टी. आणि जे ई.ई. साठी मार्गदर्शन वर्ग चालवले जात असून विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा नगर मधील गवांदे क्लास मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे. प्रा.प्रभाकर गवांदे स्वतः विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देखील दिले जाते. ५ जून पासून अकरावी गणित या विषयासाठी स्वतंत्र बॅचेस सुरू होणार असल्याची माहिती गवांदे यांनी दिली.