Friday, June 14, 2024

मांडवे येथे उद्यापासून दोन दिवशीय भव्य वैष्णव मेळावा

मांडवे येथे उद्यापासून दोन दिवशीय भव्य वैष्णव मेळावा
नगर दि.29- नगर तालुक्यातील मांडवे येथे सच्चिदानंद नाना महाराज ( पिंपळा ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 30 व 31 मे रोजी भव्य वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हभप बबन निमसे आणि हभप सुभाष निमसे यांनी दिली.
श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) आणि हभप रामदास बाबा बुधवारे ( घोटी ) यांच्या आशीर्वादाने, हभप साहेबराव महाराज निमसे यांच्या प्रेरणेने मांडवे पंचक्रोशीतील सर्व भाविकांसाठी हा वैष्णव मेळावा होत आहे. दि. 30 मे रोजी सकाळी 9 वाजता हभप जालिंदर महाराज नरवडे, हभप गोरक्षनाथ रक्ताटे, बाबासाहेब निक्रड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन मेळाव्यास प्रारंभ होईल. त्यानंतर विनापूजन, टाळपूजन, मृदुंगपूजन, ग्रंथपूजन, संत महिमा पूजन, कलश पूजन, ध्वज पूजन, तुळस पूजन होईल. यावेळी पत्रकार भाऊसाहेब होळकर, चंद्रकांत शेळके उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वाजता हभप महादेव महाराज बनकर ( सांडवा) यांचे उद्घाटनपर किर्तन होईल. दुपारी 12 ते 1 महाप्रसाद, दुपारी 1 ते 3 चक्री प्रवचन, दुपारी 3 ते 4 विशेष प्रवचन, सायंकाळी 4 ते 6 हभप सचिन महाराज चकवे ( पुणे ) यांचे कीर्तन होईल. रात्री 8 वाजता महाप्रसाद झाल्यानंतर रात्री 9 ते 11 यावेळेत हभप संपत महाराज हांडे ( मुंबई ) यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 8 वाजता सर्व साधक मंडळींच्या उपस्थितीत गावातून दिंडी प्रदक्षिणा होईल. त्यानंतर 9 ते 10 या वेळेत हभप धनराज महाराज पाटील ( खान्देश ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. हभप ज्ञानेश्वर महाराज निमसे आणि संजय कुलकर्णी यांची हार्मोनियमसाठी साथसंगत असणार आहे. मृदुंगाचार्य नरेंद्र महाराज, अमृते महाराज, सुदर्शन महाराज तर गायनाचार्य हभप गोविंद महाराज आहेत.हभप धोंडीभाऊ निक्रड आणि हभप बबन निमसे यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles