Sunday, July 14, 2024

डॉक्टर अनिल आठरे यांनी लावलेले आरोप हे बिनगुडाचे – गणेश फसले

डॉक्टर अनिल आठरे यांनी लावलेले आरोप हे बिनगुडाचे – गणेश फसले

नगर : शहरातील डॉक्टर अनिल आठरे यांनी लावलेले आरोप हे बिनगुडाचे आहेत, याचा एकूण एक पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे असे गणेश फसले यांनी सांगत डॉक्टर अनिल आठरे यांनी जे काही सांगितले आहे त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. असे आव्हान दिले आहे.
गणेश फसले पुढे बोलताना म्हणाले की, डॉक्टर आठरेंचे म्हणणे आहे की माझ्याकडून त्यांना 1 कोटी 80 लाख रुपये घेणे आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे आम्ही एप्रिल 2022 पर्यंत सगळे देणं क्लिअर करून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली होती की आम्ही जागा खाली करतोय व मे महिन्याची जे काय देणे आहे ते तुम्ही डिपॉझिट मधनं वजा करून घ्या असे सांगण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी तसे न करता आम्हाला बाहेर काढून पुन्हा सर्व रूमला कुलूप लावून सर्व वस्तू बेकायदेशररित्या ताब्यात ठेवल्या आहेत व मला म्हणालेत की जे करायचे ते कर त्यानंतर मी खूप विनंती केली परंतु डॉक्टरांनी कुठलीच दखल न घेता वारंवार मला हाकलून लावले आणि आज डॉक्टर आमच्यावर आरोप लावतायेत की आम्ही एक कोटी 80 लाख रुपये पेंडिंग ठेवून डॉक्टरांनी आमच्यावरती चेक बाउन्स 138 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे हे डॉक्टर साहेबांचे म्हणणे आहे परंतु त्याची दुसरी बाजू अशी डॉक्टरांना आम्ही रेंट एग्रीमेंटच्या वेळी जे सिक्युरिटी चेक दिले होते ते डॉक्टर साहेबांनी जाणीवपूर्वक किंवा त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांनी बाउन्स करून घेतले व त्या चेकवर फक्त आमच्या एकाच व्यक्तीची सही घेतलेली होती जॉईंट अकाउंटला 2 सह्या असल्याशिवाय चेक पास होत नाही. डॉक्टरांनी हे जाणीवपूर्वक केले कारण की असं क्रिमिनल माईंड हे डॉक्टरांचा पूर्वीपासून आहे माझ्याच प्रमाणे 2014 ला त्यांनी असेच राजेंद्र पगार यांना हॉस्पिटल चालवण्यास दिले भाड्याची रक्कम ही दोन लाख 80 हजार रुपये असताना त्यांच्याकडूनही अडीच लाख रुपये स्वतःला पगार व त्यांची पत्नी यांना ही अडीच लाख रुपये प्रति महिना पगार असं रेंट एग्रीमेंट झाल्यावर डॉक्टर दोन दिवसांनी नोटरी करायला भाग पाडतात आणि मग हेच भाडे असे सगळ्यांना सांगतात परंतु हे सत्य नाही डॉक्टरांचा तो स्वभावच आहे भाडे करायला फसवण्याचा व त्याच्या वस्तू डांबून ठेवून आपला फायदा करून घेण्याचा डॉक्टरांनी असे म्हटले आहे की त्यांच्या मुलीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य आम्ही केलेले आहे परंतु जर पत्रकार महोदयांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पाहिले व्यवस्थित न काटछाट करता तर आपल्या लक्षात येईल त्यांची मुलगी ही सुरुवातीला लाकडी दांडके हातामध्ये घेऊन जशी उभी होती तशीच ती शेवटी आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर जात असतानाही त्या ठिकाणी उभी होती तिला कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन कुठल्याही व्यक्तीने केलेले नाही उलट ज्यावेळी डॉक्टर अनिल आठरे हे पायऱ्या चढून वरती आले तेव्हा त्यांनी मी उभे असताना माझ्या तोंडावर कानावर व छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली तसेच डॉक्टरांना हेही माहिती होते की मी हृदयाचे पेशंट आहे हे माहीत असताना त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या डाव्या बाजूलाच मला मारहाण केली
डॉक्टरांनी माझ्या डिग्री बद्दल आरोप लावलेले आहेत तर डॉक्टरांनी ते माझे जे काही डिग्रीचे डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण कायदेशीर रित्या मागावे ते मी देण्यास तयार आहे त्यामुळे मी काय शिकलो किंवा मी काय नाही शिकलो हे शिकवणारे तुम्ही कोण असा माझा डॉक्टरांना उलट प्रश्न आहे, डॉक्टर अनिल आठरे हे लोकांना सांगताहेत की आम्ही त्या ठिकाणी दरोडा टाकला किंवा माझ्यावरती दरोड्याचा गुन्हा दाखल करा परंतु कुठल्या कायद्यामध्ये असे लिहिलेले आहे की तुम्ही स्वमालकीच्या वस्तू ताब्यात घेताय म्हणजे तुम्ही दरोडा टाकताय हे संपूर्णपणे चुकीचे आहे माझ्याकडे मी घेतलेल्या वस्तूंचे बिल त्याच्या दिनांक व त्याच दिवशी ज्यांच्याकडनं वस्तू घेतल्यात त्यांना बँकेतून पैसे ट्रान्सफर केल्याचे डिटेल्स आहेत हे सर्व असतानाही त्या वस्तू माझ्या नाहीत व डॉक्टरांच्या आहेत असं ते सांगतात हे कितपत योग्य हे मलाच कळेना डॉक्टरांबरोबर मी दोन वर्षे व्यवहार केलेला आहे मला तो संपूर्ण माहिती आहे डॉक्टरांचे कुठलेही टॅक्स मी चुकवलेले नाहीयेत डॉक्टरांनी ज्या काही रकमा आहेत त्या मला वैयक्तिक कॅश मागितल्या होत्या परंतु मी त्यांना कुठली रक्कम कॅश न देता जानेवारी 2022 ला डॉक्टरांना माझ्या वैयक्तिक भारतीय स्टेट बँकेच्या अकाउंट मधून पैसे दिल्याची इंट्री सुद्धा माझ्याकडे आहे यामध्ये कुठलंही स्टेटमेंट हे मेनी प्लेट करता येत नाही मी पत्रकार बांधवांना माझे अकाउंट नंबर देतो माझ्या स्टेटमेंट बद्दल शंका असेल तर कोणीही त्या अकाउंट वरती स्टेटमेंट घेऊन शहानिशा करू शकतात जर आम्ही त्या ठिकाणी दरोडाच्या हिशोबाने गेलो आणि वस्तू चोरायला आमचा हेतू असता तर त्याकरता इतकं राज रस कुणी त्या ठिकाणी जात नसतं सार्वभौमिक विचार करूनच व्यक्ती हा निर्णयापर्यंत पोहोचतो डॉक्टर सांगतात की 2022 पासून दोन वर्षानंतर यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली परंतु तसे नसून डॉक्टरांनी जेव्हा मला हाकलून दिले तेव्हा 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहिला तक्रार अर्ज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ई-मेल द्वारे पाठवला व त्याचा रिप्लाय 12 ऑक्टोबर 2022 रोजी मला मिळाला की तुमचा अर्ज गृह विभागाकडे पाठवण्यात येत आहे परंतु सदर अर्जावरती डॉक्टर अनिल आठरे यांनी कुठली कारवाई होऊ दिली नाही उलट मलाच प्रेशर निर्माण करून सदर अर्ज निकाली काढण्यास सांगितला तर नंतर मी शांत न राहता 8 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा गृह विभागाकडे नव्याने अर्ज केला तसेच 14 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक साहेबांकडे अर्ज केला त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर 2023 मध्ये पोलीस अधीक्षक साहेबांकडे अर्ज केला तर नंतर पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा पोलीस प्रशासनाला अर्ज केला परंतु वेळोवेळी डॉक्टरांनी त्यांची राजकीय ताकत वापरून प्रशासनाला मला मदत करण्यापासून रोखले सदर त्रासास कंटाळून मी मार्च महिन्यामध्ये मी भाड्याने घेतलेल्या जागेमध्ये ठिय्या आंदोलन केले व माझं त्याही वेळी तेच म्हणणं होतं की जर ही जागा मी पूर्णपणे सोडली व आमचा व्यवहार संपलाय तर डॉक्टर साहेबांनी मला ताबा पावती दाखवावी की ज्यामध्ये माझ्या वस्तू मला दिल्यात त्यांनी वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टरांच्या कधीच तिथे वस्तूच नव्हत्या कारण जेव्हा त्यांनी मला हॉस्पिटल दिलतं तेव्हा मला सगळं नवीन घ्यावं लागलं होतं डॉक्टरांनी त्यांचे ॲल्युमिनियमचे दरवाजे सुद्धा काढून नेले होते डॉक्टरांनी कुठलेही पुरावे दाखवावेत मी सदर जागेवरती परत कुठल्याही प्रकारची मागणी करणार नाही परंतु या अनिल आठरे व अंजली आठरे ह्या निर्दयी लोकांनी माझ्यासारख्या गरीब मुलाला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त केला आहे तरी माझी प्रशासनास विनंती आहे जो कुठला गुन्हा दाखल करायचा आहे तो कागदपत्रांची पडताळणी करूनच करावा कारण नऊ जून 2023 रोजी जी एफ आय आर दाखल झाली त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ॲडिशनल कलम वाढवण्यात आले जेणेकरून आम्हाला दाबता येईल व या वस्तू व पैसे देण्याचा संबंध येणार नाही आणि हे जे काही करतोय हे डॉक्टर संपूर्णपणे राजकीय सपोर्ट घेऊनच करतात आणि आपल्यासारख्या गरिबाला कोणीही राजकीय सपोर्ट करत नाही हे सत्य आहे तरी मी जनतेला आवाहन करतो डॉक्टरांनी जे काही सांगितला आहे त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. मी जे सांगतोय याचा एकूण एक पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles