अनिता पिसोटे यांना पीएच.डी. प्रदान
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील अनिता सुनील पिसोटे पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरकडून कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ‘अ स्टडी ऑफ टीचर्स युज ऑफ आयसीटी ब्लुज इन क्लासरूम टू एनहान्स टेक्नॉलॉजी इनेबल्ड लर्निंग इन सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल्स इन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट’ या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला.
त्यांनी या अगोदर राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज , मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी कॉलेज, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मधील मॅनेजमेंट सायन्स विभागातील संशोधन केंद्रात संशोधन अधिछात्रवृत्तीधारक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे म्हणून काम केलेले असून त्या सहाय्यक प्राध्यापक, जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली, पुणे येथे कार्यरत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील अनिता पिसोटे यांना पीएच.डी. प्रदान
- Advertisement -