रेड रन स्पर्धेत मुलींमध्ये कु. निशा दीपक भिडे प्रथम तर मुलांमध्ये रोहित राधाकिशन पाटोळे प्रथम
डॉ. संजय घोगरे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर मार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात असलेल्या रेड रिबीन क्लब सदस्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
आज आयोजित करण्यात आलेल्या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील रेड रिबीन क्लब असलेल्या महाविद्यालयातील रेड रीबन क्लब सदस्य व इतर विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन डॉ. साहेबराव डावरे , डॉ. शिवशंकर वलांडे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले .
स्पर्धा रेल्वे उडान पुला पासून केडगाव देवी रोड, देवी मंदिर परिसर, व परत त्याच मार्गाने रेल्वे उडान पुलाजवळ समाप्त करण्यात आली .
सदर स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोहित राधाकिशन पाटोळे ,
द्वितीय क्रमांक संकेत पवार, तृतीय क्रमांक शुभम खेडकर तर मुलींमध्ये प्रथम कु. निशा भिडे, द्वितीय क्रमांक रेणू शेखावत, तृतीय क्रमांक सीमा शिंदे यांनी पटकावला,
रेड रन स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम प्रथम क्रमांक 1500/- द्वितीय 1000/- तृतीय 500- मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले .
बक्षीस वितरण कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉ. साहेबराव डावरे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी एच आय व्हीं/एड्स बाबत चे ज्ञान घेण्याबाबत, प्रत्येकाने आपली स्थिती जाणून घेण्याबाबत, तसेच या संसर्ग चे अनुषंगाने जोखीम न पत्करण्याबाबत, आवाहन केले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले, त्यात कार्यक्रमाचा, युवा महोत्सव चां उद्देश, एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेल्या सेवा, सुविधा केंद्रांची माहिती व तसेच एचआयव्ही एड्स ची मूलभूत माहिती, संसर्गाचे कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज इत्यादी बद्दल माहिती दिली. तर विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. रवींद्र चौबे यांनी मार्गदर्शनात एच आय व्ही एड्स बाबत कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचा उल्लेख करून आतापर्यंत झालेल्या प्रभावी कामाबद्दलचे प्रशंसा केली, युवकांनी आपल्या आरोग्याकडे शारीरिक तंदुरुस्ती कडे अधिक लक्ष देणे करिता मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिता लवांडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. नवनाथ लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास
प्रा. दादासाहेब रंगनाथ काजळे , प्रा. डॉ. अमरनाथ शांताराम कुमावत ,प्रा. डॉ. शर्मिला भाऊसाहेब पारधे प्रा.डॉ. अविनाश ओंकारराव भांडारकर प्रा.श्री.सुनील बाबासाहेब वाकचौरे , श्री. राजेंद्र पोकळे
इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दिनेश लोंढे, श्री राहुल कडूस, सविता बेलेकर, श्री राधाकिशन पाटोळे, श्री प्रवीण देठे, श्री वाळू इदे, श्री राहुल दौंडे, श्री सागर फुलारी, श्री अरबाज शेख ,श्रीमती वैशाली कुलकर्णी , श्री सुनील ढलपे, श्री आकाश काळे ,श्रीकांत शिरसाट इत्यादींनी परिश्रम घेतले.