सरस्वती शालेत रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शिक्षणाची वारी सोहळा उत्साहात साजरा
शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी सरस्वती प्राथ. माध्य. व उच्च माध्य. विद्यामंदिर प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त शिक्षणाची वारी सोहळ्याचे तसेच गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले .या सोहळ्यासाठी ह भ प तुळशीराम लबडे (सर) महाराज उपस्थित होते त्यांचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले ह भ प लबडे महाराज यांनी पंढरीची वारी कशासाठी करायची तसेच शिक्षणाची वारी व जीवनाची वारी व पसायदानाचे महत्त्व मुलांना सांगितले तसेच या सर्व वारिंचा शेवट म्हनजे फक्त जीवनचा आनंद असे संगितले तसेच गुरु विषयी माहिती व वेळेचे महत्त्व मुलांना सांगितले श्रीमती प्रमिला कारले मॅडम यांनी गुरुपौर्णिमेविषयी विद्यार्थ्यांना आपल्या गीतातुन गुरुचे महत्व सांगितले डॉ.रविंद्र चोभे सर यांनी रंजक गोष्टीतून विद्यार्थ्यांना गुरुचें महत्त्व सांगितले या वेली मा प्रा. श्री मणिकराव विधाते सर श्री अविनाश साठे सर श्री. शिवाजी मगर सर तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणे केली शाळेतील बाल चंबुनी शाळेच्या प्रांगणात छान रिंगण तयार विठ्ठलाच्या गण्यवार नृत्य केले मुलिनी मुलानी तसेच मुख्याध्यापक शिक्षक यानी फुगडी खेलली टाळ मृदुंग याचा जयघोष केला याचा आनंद मुलांनी घेतला विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम मुक्ताबाई. संत नामदेव अशा विविध संतांची वेशभूषा करून मुले आली होती तसेच या सर्व कार्यक्रमासाठी मा. श्री. ह. भ.प. लबडे महाराज , मा. प्राध्यापक श्री मणिकराव विधाते सर मा. प्राचार्य श्री रविंद्र चोभे सर शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी मॅडम मार्गदर्शिका श्रीमती कारले मॅडम मोठ्या प्रमाणत पालक विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता खिलारी मॅडम यांनी केले.
सरस्वती शालेत रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शिक्षणाची वारी सोहळा
- Advertisement -