बाल चित्रकला स्पर्धेत ऐश्वर्या शिरवाळेचे उल्लेखनीय यश
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर शाळेची विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या हर्षल शिरवाळे हिचा लिंपणगाव केंद्रातून प्रथम क्रमांक आला. श्रीगोंदा शुगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ती इयत्ता चौथी मध्ये शिकते.. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वांनी तिचे या यशाबद्दल कौतुक करून तिचे मनापासून अभिनंदन केले.. अगदी लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने प्रत्येक वर्षी आयोजित विविध चित्रकला स्पर्धामध्ये तिने उल्लेखनीय यश मिळवलेले आहे. अगदी अचूक रेखाटन आणि त्यात अप्रतिम रंग भरण्याची उपजत कला तिच्यामध्ये दिसून येते. भविष्यात ती निश्चितच एक उत्कृष्ट चित्रकार होऊ शकते याची प्रचिती तिच्या चित्रांमधून जाणवते..यासाठी तिला तिचे वडील हर्षल शिरवाळे व आई अमृता शिरवाळे तसेच शाळेतील वर्गशिक्षक श्री. रवींद्र होले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.. या यशाबद्दल श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सत्यजित मच्छिंद्र साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. निळकंठ बोरुडे साहेब, लिंपणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख मा.अलका भालेकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. पद्मा शिर्के मॅडम, शाळेतील शिक्षक डोंगरे मॅडम, हिरवे सर, वेठेकर मॅडम, गोरे मॅडम,पऱ्हे मॅडम आदींनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या..
बाल चित्रकला स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील ऐश्वर्या शिरवाळेचे उल्लेखनीय यश
- Advertisement -