ह.भ.प.ढोक महाराजांचा ८ सप्टेंबरला अभिष्टचिंतन सोहळा
रामायणाचार्य ह.भ.प. श्री रामरावजी महाराज ढोक (नागपूरकर) यांचा ७० वा अभिष्टचिंतन सोहळा श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. होणार असल्याची माहिती ॲड.वैभव आंधळे यांनी दिली.
याबाबत ॲड.आंधळे यांनी सांगितले की, ह.भ.प. ढोक महाराज यांचा दि. ८ सप्टेंबर ला ७० वा वाढदिवस आहे व त्यानिमित्त ह.भ.प. ढोक महाराज यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “तुलसीदास ” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य ह.भ.प. श्री मारुती महाराज कुऱ्हेकर यांना “शांतीब्रह्म ” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होईल तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार हे राहतील तर खा.डॉ.अमोल कोल्हे ,खा.श्रीरंग बारणे ,आ.महेश लांडगे, आ.अश्विनीताई जगताप, आ.दिलीप मोहिते पाटील,माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील.माजी आ.विलासराव लांडे, माजी आ. बापूसाहेब पठारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान समारंभ व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.याप्रसंगी सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (हासेगावकर ) यांचे कीर्तन होणार आहे व त्यानंतर कार्यक्रम सुरू होईल. हा कार्यक्रम फूटवाले धर्मशाळा,प्रदक्षिणा रोड,श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री ह.भ. प. रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक ( नागपूरकर) यांचे १९७९ ते १९८३ चे श्री सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुबंधू यांनी केलेले आहे तरी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. वैभव आंधळे यांनी केले आहे.
ह.भ.प.ढोक महाराजांचा ८ सप्टेंबरला अभिष्टचिंतन सोहळा
- Advertisement -