Sunday, July 14, 2024

Ahmednagar news: चालू बसमध्ये मोबाइल पाहणारा चालक होणार निलंबित

शेगावहून-पार्थर्डिकडे ही एसटी महामंडाळाची बस निघाली होती. प्रवास सुरू असताना चालक रस्त्याकडे जराही पहात नाहीये. तो आपल्या धुंदीत फोनमध्ये मग्न होऊन बस चालवतो आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर मोठा संताप व्यक्त केला आहे.
एसटी वाहनचालकाने देखील असाच हलगर्जीपणा केला आहे. राज्यात अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करतात. बसने प्रवास करताना सुरक्षित प्रवास होणार असा विश्वास ते वाहनचालकावर ठेवतात आणि निश्चिंत प्रवास करतात. मात्र आता व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून प्रवाशांमध्ये भीतीसह संतापाची लाट उसळली
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटीचा चालक दिलीप राजळे गाडी सुरू असतानाच मोबाईल पाहात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रशासन अॅक्शनमोडवर आले असून, शुक्रवारी (१४ जून) या चालकावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles