Saturday, December 7, 2024

नगर जिल्ह्यातील ‘या’गावाची राज्यात चर्चा ! ‘थर्टी फस्ट’ला दारू मटण….

अहमदनगर : तरुणाई आणि एकूण ग्रामस्थ तसेच पंचक्रोशितील लोकांना भक्ती मार्गाला लावणाऱ्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थानाचा आमटी-भाकरीचा महाप्रसाद आता इतर चांगलाच नावारुपाला आला आहे. नगर जिल्ह्यातील अनेक देवस्थांनानी यातून प्रेरणा घेत आपल्याकडेही ही पद्धत सुरू केली आहे. यावर्षी ३१ डिसेंबर रविवारी आल्याची पर्वणी साधत आगडगाव देवस्थानने आपला रविवारचा महाप्रसादाचा कार्यक्रम आणखी व्यापक केला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला गावातील आणि पंचक्रोशितील ग्रामस्थ इतर कुठल्या पार्ट्यांऐवजी आमटी-भाकरीचा बेत करणार आहेत. यासाठी १५१ अन्नदात्यांना संधी मिळणार असून पंधरा ते वीस हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मंदिर परिसरात सजावटही करण्यात येणार आहे.
आगडगाव येथे देवस्थानाजवळ बाजरीची भाकरी व आमटी असा महाप्रसाद प्रत्येक रविवारी दुपारी दिला जातो. त्यासाठी राज्यभरातून अन्नदानासाठी नावनोंदणी होते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रविवार येत असल्याने अन्नदानासाठी अनेक भाविकांची इच्छा होती. त्यामुळे १५१ अन्नदात्यांच्या हस्ते अन्नदान करण्याचा निर्णय ट्रस्टच्यावतीने घेतला आहे. या दिवशी डॉ. सतीश गिते यांच्या वतीने मंदिराला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. अन्नदानाच्या या उपक्रमाची ख्याती राज्यभर आहे. तसेच परदेशातूनही भाविक येत आहेत. भक्तनिवास, अन्नछत्रालय, प्रतीक्षालय, प्रवाशांसाठी दोन बस अशा सुविधांनामुळे भाविकांना आवश्यक सुविधा मिळतात. हा परिसर निसर्गरम्य परिसरात असल्याने पर्यटकांची मांदियाळी असते.
केवळ नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यातूनही येथ भाविक आणि अन्नदाते येतात. अन्नदात्यांना आधीच बुकिंग करावे लागते. या गावातील आमटी-भाकरीचा प्रसाद आता चांगलाच प्रसिद्ध झाला असून जिल्ह्यातील इतर काही देवस्थांनामध्येही तो सुरू करण्यात आला आहे. यासाठी आगडगावच्या विश्वस्त मंडळाकडून आणि कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्यासाठी विविध ठिकाणचे पदाधिकारी येतात.
नगर जिल्ह्यातील अनेक गावांत अलीकडेच असा आमटी-भाकरीचा प्रसाद सुरू करण्यात आला आहे. यासंबंधी आगडगाव देवस्थानचे सल्लागार मुरलीधर कराळे यांनी सांगितले, ‘आगडगाव देवस्थानने पशुहत्या बंदीचा निर्णय घेऊन आमटी-भाकरीचा महाप्रसाद सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय पूर्वीच घेतला. तो यशस्वी करण्यात सर्वांच्या सहकार्याने यश आले. आता त्यापुढे जाऊन इतर गावांनाही आमटी-भाकरीचा प्रसाद ठेवावा वाटतो, तशी पद्धत सुरू झाली, हे आमच्यासाठी समाधानाचे आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. ३१ तारखेला भाविकांना आगडगावला जरूर यावे. नेहमीच्या वेळात दुपारीच या महाप्रसादाचे वापट केले जाणार आहे.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles