Thursday, March 20, 2025

Ahmednagar News ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद

आढळगांव, ता. श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/09/24 रोजी फिर्यादी श्री. दिपक दादाराम राऊत धंदा हॉटेल व्यवसाय, रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा हे माहिजळगांव बायपास, ता. कर्जत येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असतांना इसम नामे शिवप्रसाद ऊर्फ बंटी उबाळे व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांचे गाडीसमोर व्हेरना व त्या मागे क्रेटा गाड्या उभ्या केल्या व क्रेटा गाडीमधील अनोळखी इसमांनी फिर्यादीस रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन आढळगांव, ता. श्रीगोंदा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचा अविश्वास ठराव मंजुर होऊ नये या उद्देशाने फिर्यादी यांचे गाडीतील ग्राम पंचायत सदस्य श्री. नितीन बन्सी गव्हाणे यांना शिवीगाळ, मारहाण केली व गाडीत बसवुन अपहरण करुन घेवुन गेले बाबत मिरजगांव पो.स्टे.गु.र.नं. 203/2024 भारतीय न्याय संहिता कलम 140 (3), 189 (2), 191 (2), 189 (3), 190, 126, 127 (2), 115, 352, 351 (2), 351 (3) सह आर्म ऍ़क्ट 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/ श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बबन मखरे, पोना/फुरकान शेख, पोकॉ/भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते. स्थागुशा पथक तांत्रिक विश्लेषण व गुप्तबातमीदारा मार्फत आरोपींची माहिती घेत असतांना दिनांक 30/07/2024 रोजी पोनि/श्री. आहेर यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे किशोर सोमनाथ सांगळे रा. सिध्दटेक, ता. कर्जत याने त्यांचे इतर साथीदारांसह केला असुन तो सिध्दटेक, ता. कर्जत येथे आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी प्राप्त माहिती वर नमुद पथकास दिली. त्यानुसार पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी सिध्दटेक, ता. कर्जत येथे जावुन आरोपीचा शोध घेता बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) किशोर सोमनाथ सांगळे वय 27, रा. सिध्दटेक, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे अमोल भोसले रा. सिध्दटेक, ता. कर्जत व माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर उबाळे रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा यांचे सांगणेवरुन त्यांचे सोबत मिळुन सागर देमुंडे, प्रतिक ऊर्फ सनि पवार व महेंद्र ऊर्फ गोट्या गोंडसे याचे सोबत मिळुन केला असल्याचे सांगितले.
//2//
ताब्यातील किशोर सोमनाथ सांगळे याने सांगितल्या नुसार त्याचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे 2) सागर चिमाजी देमुंडे वय 27, रा. आळसुंदे, ता. कर्जत, 3) प्रतिक ऊर्फ सनि राजेंद्र पवार वय 25, रा. सोनारगल्ली, ता. कर्जत, 4) महेंद्र ऊर्फ गोट्या अरुण गोंडसे वय 26, रा. जोगेश्वरवाडी, ता. कर्जत यांचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपींनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले. आरोपींचे साथीदार नामे 5) अमोल भोसले रा. सिध्दटेक, ता. कर्जत (फरार) व 6) माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर उबाळे रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा (फरार) यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी मिरजगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीता आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles