Thursday, July 25, 2024

मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानबाह्य, त्यांचे काही चालू देणार नाही, ॲड.सदावर्तेंनी सुनावले

आमची ताकद संविधानाची आहे, तुमची अत्याचाराची आहे. संविधानाने दिलेल्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. त्यामुळे संविधानबाह्य आरक्षणाची मागणी करून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या मनोज जरांगे यांचे येणाऱ्या काळात काहीच चालू देणार नाही, अशा शब्दांत आणि दंड आणि मांड्या थोपटत अॅड. गुणवर्ते सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आव्हान दिले.

अॅड. सदावर्ते यांनी मंगळवारी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. जरांगे यांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला. अॅड. सदावर्ते म्हणाले, हिंदू नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतात. भारताच्या राज्यघटनेवर त्यांचा विश्वास आहे. राज्यघटनेनुसार नसेल तर आरक्षणाच्या गलिच्छ राजकारण करू दिले जाणार नाही. पवार आणि ठाकरे यांना इतर राजकीय गोष्ट कराव्यात मात्र, आरक्षणाचे राजकारण आम्ही करू देणार नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles