नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत अजय भुजबळ बिनविरोध विजयी
नगर: अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत इतर मागास वर्ग गटातून अजय बाळासाहेब भुजबळ बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी सतिष दिघे यांनी २० ऑगस्ट रोजी समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. अजय भुजबळ जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात.