अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पदावर श्री देविदास पवार यांची नगर विकास विभागाने नियुक्ती केली आहे
नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्याधिकारी तसेच परभणी, जळगाव येथे आयुक्त या पदावर काम केले आहे. त्यांची तब्बल २२ वर्षे प्रशासकीय सेवा झाली आहे. अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. डॉक्टर प्रवीण अष्टीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पवार यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार देण्यात आले होते. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात येथे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार यांचे शिक्षण परभणी येथे झाले. 1996 मध्ये त्यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील पालिकांमध्ये मुख्याधिकारी (सीओ) म्हणून कार्य केले.
अहमदनगर महानगरपालिकेला मिळाले नवीन आयुक्त…शासनाचा आदेश
- Advertisement -