Tuesday, February 27, 2024

विमानाने अयोध्येला राम दर्शनाला जायच? खा.विखेंनी जाहीर केली अभिनव स्पर्धा

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रत्येक गावातील नागरिकाने आपल्या घरी सुंदर असे उपक्रम राबवून रांगोळी, सजावट, देखावा, चित्र साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन खासदार विखे यांनी जिल्हावासियांना केले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राबविलेल्या उपक्रमाचा फोटो तसेच सदरील उपक्रमासोबत आपला सेल्फी असे दोन छायाचित्र आपल्या तालुक्यासाठी देण्यात आलेल्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक असणार आहे. तसेच आपले नाव, गाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देखील यामध्ये असणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धकाने राबविलेल्या उपक्रमाचा फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून @drsujayvikhe या अकाउंटला टॅग केल्यास अतिरिक्त गुण देखील मिळणार आहेत. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी असणार आहे. या स्पर्धेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामधून एक विजेता तर शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून एक विजेता निवडण्यात येणार आहे. या विजेत्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नगर शहर – ८२३७९४००८१, नगर तालुका – ७७०९५३००८२, श्रीगोंदे – ८१४९५३००८४, कर्जत – ७३८७१४००८५, शेवगाव – ७२४९१४००८७, राहुरी – ७२४९५९००८३, जामखेड – ८६२४०७००८९, पाथर्डी – ७०२८८९००८६, पारनेर – ७०२८७४७०८८ या तालुकानिहाय व्हाॅट्सॲप क्रमांकावर वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती पाठवायची आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles