Sunday, December 8, 2024

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्यात अजितदादांसमोर पेच…. जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी अचानकपणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

बाळासाहेब नाहाटा मागील सहा महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपदाचे काम पाहत होते. लोकसभा निवडणूक काळात समर्थकांचा मेळावा त्यांनी नगरमध्ये घेतला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे.

बाळासाहेब नाहाटा म्हणाले की,

मी राज्य बाजार समितीचा सभापती आहे व राज्यातील ३२२ बाजार समिती विकासासंदर्भात काम करतो. याशिवाय कृषी आणि पणन मंडळावरही मी संचालक आहे. नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद असताना धुळे जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी पक्षाने दिली. एकाच वेळी एवढ्या पदांवर काम करणे अशक्य आहे. तसेच महायुतीत कोणत्याही पक्षाला श्रीगोंद्याची उमेदवारी गेली तरी पक्षाचा प्रोटोकॉल पाळून आम्ही मदत करणार आहोत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles