Sunday, July 21, 2024

आगामी विस्तारात आ. संग्राम जगताप यांचे मंत्रिपद निश्चित… जिल्हाध्यक्षांना विश्वास

नगर : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात त्यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले .

अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बाळासाहेब नाहटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष संजय कोळगे व अभिजीत खोसे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या, मंगळवारी व परवा, बुधवारी असे दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने नगरला मंत्रिपद मिळेल, असा अशावादही नाहटा यांनी व्यक्त केला. महायुती सरकार सध्या महामंडळाच्या नियुक्ती करत आहे. त्या झाल्या की लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, या विस्तारात नगर जिल्ह्याला स्थान मिळेल. जगताप यांच्या माध्यमातून नगरला राज्यमंत्रिपद मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles