Thursday, May 22, 2025

मोठ्याचे लेकरू आहे, त्याचा छंद पुरवलाच पाहिजे… बाळासाहेब थोरात यांचा सुजय विखेंना खोचक टोला…

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर व राहुरी विधानसभा लढवणार असल्याचे सूचक विधान प्रसार माध्यमांशी बोलतांना केले होते. या विधानामुले राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले होते.यावर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील याना खोचक असा टोला लगावला आहे.

आमदार थोरात म्हणाले, मोठ्याचं ते लाडकं लेकरू आहे. त्याचा छंद असलच तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाहीतर तो पालकांनी पुरवला पाहिजे लेकराचा छंद. दोन ठिकाणी त्यांनी म्हटले आहे.हा छंद पुरवण्यासाठी एकाच वेळी दोन ठिकाणी राहिले पाहिजे आणि छंद पुरवला पाहिजे त्यामुळे बालकांचा छंद पुर्ण होईल असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles