भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कापड बाजारात व्यापारी वर्गाकडून मोठे स्वागत
नगर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर शहर दौऱ्यात कापड बाजार परिसराला भेट देऊन कापड बाजार श्री गणेश मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यांचे भाजपचे शहर जिल्हा चिटणीस महावीर कांकरिया, कापड बाजार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, गणेश मंडळाचे अध्यक्ष चिंटू खंडेलवाल यांनी स्वागत करुन सत्कार केला.
याप्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील , भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, नगर शहर विधानसभा अध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्यासह संभव काठेड, संतोष ठाकूर, सचिन चोपडा, ओमप्रकाश बायड, आनंद आहेर, सचिन कटारिया, योगेश लखारा, ओम् आहेर, नवीन किंगर, सौरभ भांडेकर, अमित नवलानी, कैलास मोहिरे, हर्षल पेटकर, तेजस डहाळे, प्रणित नारंग, किशोर तलरेजा, गणेश गोयल, रोहित नवलानी, अमित सोनग्रा, हरेश कल्याणी, निलेश गुंदेचा, निक्की गोपालनी, जवाहर गांधी, प्रतीक बोगावत, मनीष सोनग्रा, केतन मुथा, अशोक उपाध्ये, रवी गांधी, ललित कटारिया, आदिंसह वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळाचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.