Saturday, October 12, 2024

Ahmednagar News :भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच दोन गटात गोंधळ, व्हिडिओ

अहमदनगर -लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यातच आता पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढताना दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात देखील जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ उडाल्याने भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.आज पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles