Thursday, September 19, 2024

भाजपचे शेलार म्हणतात…विधानसभेला फिर एक बार आ.संग्राम जगताप…

पाईपलाईन रोड हनुमान नगर येथे मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आ.संग्राम जगताप यांच्या मध्येच – सावेडी भाजप मंडळ अध्यक्ष नितीन शेलार

नगर – नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळाले आहे त्यांनी नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे मूलभूत प्रश्न माहिती आहे त्यामुळेच नगरकरांनी कामाच्या माध्यमातून विधानसभेच्या सदस्य पदावर पाठवले आहे त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे सावेडी उपनगराच्या विकासाला गती दिल्यामुळेच विस्तारीकरण झपाट्याने झाले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळेच शहरांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या मध्येच असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नगरकरांनी पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवावे असे प्रतिपादन भाजपाचे सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार यांनी केले
पाईपलाईन रोड हनुमान नगर येथे मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सावेडी भाजप मंडळ अध्यक्ष नितीन शेलार ॲड स्वाती जाधव, शिवाजी डोके, अशोक खोखराळे, विलास भापकर, चिंतामणी चौधरी, विठ्ठल कडूस, बबन वावरे, शरद मगर, रवींद्र वायकुळे, सूर्यभान मासाळ, भगवान घाडगे, मारुती सिनारे, किसन कोल्हे, अमित वाघमारे, महेश जपे, बंडू लांडगे, विजय निक्रड, अनिल वाबळे अदि नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

नगर शहरातील जनतेच्या मत रुपी आशीर्वादा मुळेच शहर विकासाला गती मिळाली आहे नागरिकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत असते सर्वांच्या चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना निर्माण होतात व त्या प्रत्यक्षात सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. शहरातील प्रलंबित सर्वच प्रश्नांवर काम सुरू आहे गुलमोहर, पाईपलाईन, तपोवन रोड आधी प्रश्न सोडवल्यामुळेच सावेडी उपनगराच्या विस्तारीकरणाला वाव मिळाला तारकपूर रस्त्याचे काम सुरू झाले आहे हनुमान नगर येथे मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निधीतून ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाचे काम मार्गी लागणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles