Monday, July 22, 2024

चालक जोमात प्रवाशी कोमात; बस चालवताना स्टेअरींग सोडून हातात घेतला फोन, संतापजनक अहमदनगर मधील धक्कादायक व्हिडिओ

मुंबई-पुण्यासह राज्यात विविध शहरांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. अपघात जास्त होत असल्याने नागरीकांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालंय. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर अशा अनेक घटना सातत्याने समोर येतायत. अशात सोशल मीडियावर असाच आणखी एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये ही घटना घडली आहे. शेगावहून-पार्थर्डिकडे ही एसटी महामंडाळाची बस निघाली होती. प्रवास सुरू असताना चालक रस्त्याकडे जराही पहात नाहीये. तो आपल्या धुंदीत फोनमध्ये मग्न होऊन बस चालवतो आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर मोठा संताप व्यक्त केला आहे.

वाहनांची धडक, व्यक्तींना चाकाखाली चिरडणे अशा अनेक घटनांमध्ये आजवर अनेकांनी आपला जीव गमवला आहे. अशात नागरिकांनी वाहतूकीचे सर्व नियम पाळणे गरजेचे असते. अनेकदा आपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची काहीच चूक नसते. समोरच्या व्यक्तीने वाहन व्यवस्थित न चालवल्याने देखील अपघात होतो आणि निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागतो.

एसटी वाहनचालकाने देखील असाच हलगर्जीपणा केला आहे. राज्यात अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करतात. बसने प्रवास करताना सुरक्षित प्रवास होणार असा विश्वास ते वाहनचालकावर ठेवतात आणि निश्चिंत प्रवास करतात. मात्र आता व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून प्रवाशांमध्ये भीतीसह संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनाकडून यावर काय कारवाई होतेय ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles