मोबाईलवर मेसेज पाठवून धमकी देऊन 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने सावेडीतील एका कॅफे हाऊसमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. ही घटना 7 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम फकिरमहंमद सय्यद (वय 27, रा. केडगाव वेशीजवळ, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपी हा त्याची मोपेड दुचाकी घेऊन कायनेटीक चौक येथे आला. फिर्यादीला त्याच्या मोपेडवर बसवून सावेडीतील एका कॅफे हाऊस येथे फिर्यादीची इच्छा नसताना घेऊन गेला. तेथे त्याने फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि विकास काळे करत आहेत
- Advertisement -