नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणी येथे संस्थाचालकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उमेदवार किशोर दराडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, विखे कुटुंबाला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यांना (निलेश लंके) तात्पुरता आणि असुरी आनंद घेऊ द्या. येत्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे, त्यामुळे सुजय तुम्ही काळजी करू नका, झालं गेलं विसरून जायचं आणि पुन्हा नव्या जोमाने काम करायचं. आपण रडणारे नाहीत, तर आपण लढणारे योद्धे आहोत, पुन्हा लढू आणि जिंकू, असं शब्दात सीएम शिंदेंनी सुजय विखेंना दिलासा दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…सुजय आपण पुन्हा लढू आणि जिंकू, त्यांना तात्पुरता असुरी आनंद घेऊ द्या…
- Advertisement -