Saturday, October 12, 2024

नगरमध्ये कांदा व्यापाऱ्याला लुटणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत…20 लाखांची रोकड हस्तगत

50 लाख रूपये लुटून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारे 5 आरोपी ताब्यात
गुन्हयातील 20 लाख रूपये रोख रक्कम हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
—————————————————————————————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. शोएब अन्वर सय्यद,धंदा कांदा व्यापारी, रा.हाजी इब्राहिम बिल्डींग, स्टेशन रोड, अहमदनगर हे व त्यांचा भाऊ समीर सय्यद असे दिनांक 07/09/2024 रोजी सकाळी 10.45 वा.दरम्यान त्यांचे टोयॅटो ग्लांझा कारने नेप्ती कांदा मार्केट येथे कांदा लिलावाकरीता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनी समोर यातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीच्या कारला धडक देऊन, गाडी आडवून आरोपीतांनी कोयत्याने व लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडुन, फिर्यादी व त्याचा भाऊ यांचेवर कोयत्याने वार करून, फिर्यादीकडील 50 लाख रूपये रक्कम बळजबरीने हिसकावून चोरुन घेऊन गेले होते. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 985/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 310 (2), 311, 324 (4), शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर दरोडयाचा गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, प्रशांत राठोड, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, शरद बुधवंत, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, अरूण मोरे अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

वरील पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन, साक्षीदाराकडे विचारपुस करून, तपास पथकाने घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपासामध्ये दोन इसम युनिकॉर्न मोटार सायकलवर फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचे दिसुन आले. तपासामध्ये सदरचा गुन्हा हा तांत्रिक विश्लेषणावरुन नागेश संजय चव्हाण, रा.मोमीन आखाडा ता.राहुरी, जि.अहमदनगर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हयाचे तपासात निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोनि/ दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडुन गुन्हयातील आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी विळद घाट परिसरातील जाणाई तलाव येथे येणार आहेत, अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खात्री करुन आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने जाणाई तलावाजवळ येथे जाऊन खात्री केली असता तेथे एक ॲपे रिक्षा, दोन मोटार सायकलसह 9 ते 10 इसम बसलेले व उभे असलेले दिसले. पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळून जाऊ लागले. पथकाने त्यापैकी 5 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) मुबारक गणीभाई आत्तार, वय 34, रा.मुकूंदनगर, ता.अहमदनगर ( रिक्षाचालक व हमाल) 2) सुनिल छबु माळी, वय 22, रा.बारागाव नांदुर ता.राहुरी (हमाल) 3) अक्षय आण्णा बाचकर, वय 22, रा.गडदे आखाडा, ता.राहुरी (हमाल) 4) मयुर उर्फ भैय्या आनंथा गायकवाड, रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी 5) मनोज सुंदर शिरसाठ, वय 33, रा.राहुरी खुर्द ता.राहुरी, जि.अहमदनगर असे सांगीतले. त्यांचेकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे पळून गेलेले साथीदार 6) नागेश संजय चव्हाण, रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी (फरार) 7) अक्षय गोपाळे, रा.बारागाव नांदुर ता.राहुरी (फरार) 8) सागर चव्हाण (घिसाडी), रा.मल्हारवाडी रोड पाटाजवळ, ता.राहुरी (फरार) 9) अक्षय छबु साळवे, रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी (फरार) 10) अंकुश नामदेव पवार, रा.प्रगती शाळेसमोर, भिलाटी, ता.राहुरी यांचेसह कट रचुन पाळत ठेवुन गुन्हा केल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडून 20,50,000/- रूपये रोख रक्कम, व 5,00,000/- रूपये किंमतीचे वाहन व मोबाईल असा एकुण 25,50,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी गुन्हयांतील आरोपी नागेश संजय चव्हाण व मुबारक गणीभाई आत्तार हे दोघे हमालीचे काम करतात.त्यामुळे त्या दोघात ओळख आहे. मुबारक आत्तार हे यातील फिर्यादी यांचेकडे यापुर्वी कामास असताना फिर्यादी व मुबारक यांचेमध्ये वाद झाल्याने मुबारक यास कामावरून काढुन टाकले होते. मुबारक याने नागेश चव्हाण यास सांगीतले की, तुम्ही जर फिर्यादीस लुटले तर खुप पैसे भेटतील त्याचेकडे खुप पैसे असतात.यावरून मुबारक व नागेश चव्हाण यांनी गुन्हयांचा प्लॅन तयार केला. त्यानंतर आरोपींनी दिनांक 05/09/2024 दिनांक 06/09/2024 रोजी अहदमनगर येथे येऊन, रेकी करून, फिर्यादीचे घर व कांदा मार्केट जाण्याचा रस्ता पाहुन गेले होते.
दिनांक 07/09/2024 रोजी मयुर गायकवाड व अक्षय बाचकर असे युनिकॉर्न मोटार सायकलवर इंपीरिअल चौक, अहमदनगर येथे थांबुन फिर्यादी निघाल्यानंतरची माहिती इतर साथीदारांना दिली व फिर्यादीचा वाहनाचा पाठलाग केला. त्यानुसार केडगाव परिसरात शाईन मोटार सायकलवर सुनिल माळी व अक्षय साळवे व केडगाव बायपास जवळ स्विफ्ट कारमध्ये नागेश चव्हाण, अक्षय गोपाळे, सागर चव्हाण, मनोज शिरसाठ अशांनी थांबुन फिर्यादीची गाडी केडगाव बायपास येथे आल्यावर, सदर गाडीचा पाठलाग करून हॉटेल राजनंदिनी समोर गाडी आडवून फिर्यादी व त्याचा भाऊ समीर सय्यद यांना कोयत्याने मारहाण करून, कारच्या काचा फोडून फिर्यादीकडील 50 लाख रूपये रक्कम बळजबरीने हिसकावून घेतलेले आहे.

ताब्यातील आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 844/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 310 (2), 311, 324 (4), शस्त्र अधिनियम 4/25 या गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

ताब्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपीपैकी 1) मयुर उर्फ भैय्या आनंथा गायकवाड याचेवर वाळु चोरी 2) अक्षय आण्णा बाचकर याचेवर खुनाचा प्रयत्न, 3) मुबारक गणीभाई आत्तार याचेवर दुखापत 4) मनोज सुंदर शिरसाठ याचेवर दुखापती असे गुन्हे यापुर्वी दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री.प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles