Tuesday, February 18, 2025

धनगर आरक्षणावरून अजित पवार गटाच्या नगरमधील आमदाराचा सरकारला घराचा आहेर

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण असून आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसे केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल; असा इशाराच राज्यातील सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सरकारला दिला आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. यावरून आमदार किरण लहामटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार नरहरी झिरवाळी यांच्यानंतर सत्तेत असेलेल्या अजित पवार गटाच्या दुसऱ्या आमदाराकडून विरोध करण्यात येत आहे. डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले, कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ४७ जमातीला आरक्षण दिले आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणीही पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायच असेल, तर स्वतंत्र द्यावे. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र असून सरकार असा का विचार करतय? किंवा काही संघटनांना का वाटतय आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तस झाल तर उग्र स्वरूपाच आंदोलन केले जाईल; असा इशारा दिला.

मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमीनी आम्ही दिल्या शोषण आमच झाल. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिले आहे, त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिल त्याची भरती देखील होत नाही. आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय हे सगळ निषेधार्ह असून सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावे; अशी मागणी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles