Ahmednagar news:कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-सोनेवाडी रस्त्यावर नऊचारी जवळ शेतीचे काम आवरून घरी येत असताना पोहेगावच्या दिशेने आलेल्या डंपरने महिलेला चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला. नऊचारी परिसरातून शेतातून आपल्या स्कुटीवर तुषार रामदास वाघ आईला पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता. रस्त्यावर नऊचारी ओलांडून स्कुटी रोडवर आली असता सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, शेतीचे कामे आवरून वंदना रामदास वाघ व तुषार रामदास वाघ हे दोघे मायलेक स्कुटीवरून नऊचारी परिसरातून पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता. दरम्यान रस्त्यावर नऊचारी ओलांडून त्यांची स्कुटी रोडवर आली असता सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्या मायलेकाच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
यामध्ये वंदना रामदास वाघ (वय ४८ वर्षे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही भयंकर होती. पोहेगाव सोनेवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. शिर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह राहाता ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
परंतु हि रुग्णवाहिका झगडे फाटा मार्गे नऊचारीकडे येत असताना पाऊस झाल्याने आणि रस्त्यावर खडी असल्यामुळे पलटी झाली. सुदैवाने चालकाला काही झाले नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णावाहिकेने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.