*अहमदनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सुट्टी १६ सप्टेंबरला*
नगर -राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार अधिसूचित केले असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ सप्टेंबरला कायम ठेवली आहे.
शासनाच्या १३ सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात मुस्लिम धर्मीयांकडून ईद-ए-मिलाद सणानिमित्त आयोजित मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबरची सुट्टी कायम ठेवावी किंवा १८ सप्टेंबर रोजी द्यावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात अधिक मिरवणुका १६ सप्टेंबर रोजी निघणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.